कधी हा गोपीचंद येतो अन् त्याचा शिरच्छेद करतो याची वाट.. फडणवीसांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल माझ्याविरोधात हत्येचा कट रचला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि पोलिसही सामील आहेत असा आरोप केला होता. पडळकरांच्या या आरोपाचे विधानसभेत पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फडणवीस म्हणाले, पोलीस स्टेशन समोर गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला झाला.दगडफेकीतुन जर पडळकरांची गाडी बाहेर निघाली नसती तर आज पडळकर हयातच राहिले नसते, कधी एकदा गोपीचंद येतो आणि त्याचा शिरच्छेद करतो याची पाहत बसले आणि शूटिंग करणारे पोलिसच होते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला

त्या क्लिप मध्ये स्पष्टपणे दिसतंय कि, गाडी निघून जाताना दिसतंय, डंपर दिसतोय, हल्ला होताना दिसतोय, दगड मारताना दिसतंय मात्र त्यातील कोणावरही कारवी करण्यात आली नाही. तुमचे आमचे विचार वेगळे असतील मात्र विरोधकांना जीवनातूनच उठवून टाकायचं हे दुर्दैवी आहे फडणवीसांनी म्हंटल

या घटनेत गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रम्हांनंद पडळकर यांच्यावरचं 307 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आहे. गोपीचंद पडळकर हा आयुष्यातून संपला पाहिजे अशी कोणाची भावना असेल तर हे लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्राला बंगाल होऊ देऊ नका, अशा प्रकारे राजकीय हत्या होऊ देऊ नका त्यामुळे आजची सर्व कामे थांवबुन या विषयावर बैठक घ्या आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी फडणवीस यांनी केली

Leave a Comment