मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा असं विधान फडणवीस यांनी केलेय.
आत्ता लोकांना तुम्ही काय मदत करणार हे सांगणे अपेक्षित आहे. मात्र अशा प्रकारची थिल्लरबाजी मुख्यमंत्री ठाकरेंनी करु नये. मोदीजी तर मदत करतीलच. ते मुख्यमंत्र्यांनी सांगू नये. कोणतेही पैसे केंद्राने अडकवलेले नाहीत. तुमचा जीएसटी कमी आला तर केंद्राने स्वत: कर्ज काढून पैसे दिले आहेत. यांच्यात हिंम्मत नाही. असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला.
दरम्यान, आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्याने ५० हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. अजून राज्य सरकार ७० हजार रुपयांचे कर्ज काढू शकते. मात्र सरकारच्यात दम नाही असं विधान फडणवीस यांनी केले आहे.