मुंबई | माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी अंडरवर्ड डाॅन करिम लाला याला भेटत होत्या असा धक्कादायक खुलासा शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन काँग्रेस पक्षाला धारेवर धरले आहे. काँग्रेसला अंडरवर्ड पैसे पुरवत होते काय? असा सवाल फडणवीस यांनी थेट सोनिया गांधींना विचारला आहे.
संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेले असतानासुद्ध काँग्रेसचे राज्यातील नेते यावर काहीही भाष्य करताना दिसत नाहीत. जर इंदिरा गांधी करिम लाला या अंडरवर्डच्या प्रमुखाला भेटत असतील तर हे गंभीर आहे. राऊत यांच्या सदर गौप्यस्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान राऊत यांनी केलेल्या विधानमुळे अंडरवर्ड काँग्रेसला पैसे पुरवत होते काय? मुंबईच्या सी.पी. ची नेमणुक अंडरवर्ड करत होते का? असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे सोनिया गांधी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.