महाविकास आघाडीचे सरकार हे लबाडच निघाले; फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडीकडून निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. गेल्या अडीच वर्षांत 700 रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळी सांगितलं होतं की लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. हे लबाडच निघाले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.

चिमूर येथील शहीद स्मृतिदिन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहताना विरोधकांवरनिशाणा साधला. ते म्हणाले की, “म्हावकास आघाडी सरकारला माझं एवढंच सांगणं आहे की 5 वर्षं आमचं सरकार होतं. सरकार कसं चालतं, हे आम्ही दाखवून दिलं. आजही लोक लक्षात ठेवतात की 2014 ते 2019 मध्ये जनतेचं सरकार होतं. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार आम्ही आणणार आहोत.

यावेळी फडणवीस यांनी ‘मविआ’वर आरोप केला. ते म्हणाले की, “संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरीब विधवांना सहा-सहा महिने मिळाले नाहीत. प्रत्येक सामान्य माणसाला त्रास देण्याचे काम झाले आहे. पण आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही. लवकरच सर्व गोष्टी आपण मार्गी लावणार आहोत, असे फडणवीसांनी म्हंटले.