हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनास उद्यापासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. विरोधीपक्षनेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारावर टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “अजित दादांना तीन वर्षानंतर नागपूरची विदर्भाची आठवण आली याचा आम्हाला आनंद वाटतो. आमच्यातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केली अशी टीका करणारे वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे ठाकरेंच्या व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांकडून महापुरुषांच्या मुद्यांवरून राजकारण केले जात आहे. त्याच्यातील काही नेत्याकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे. खास करून अजित दादांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना तीन वर्षे विदर्भ कधी दिसलाच नाही. त्यांनी कोरोनाचे कारण सांगत नागपूरला अधिवेशन घेण्याचे टाळलेल. आमचे सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतर आता नागपूरला तीन वर्षानंतर अधिवेशन होत आहे.
#LIVE : विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… https://t.co/BHCPhc6FRV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 18, 2022
लोकायुक्त कायद्याचं बील याच अधिवेशनात मांडणार : देवेंद्र फडणवीस
अण्णा हजारे यांच्या समितीचा रिपोर्ट सरकारने स्वीकारला आहे. नवीन लोकायुक्त कायद्याला मुख्यमंत्री यांनी मजुरी दिली आहे. राज्यात पहिल्यादा मुख्यमंत्री यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणार आहोत. मंत्रिमंडळ देखील लोकायुक्तात येईल. अँटी करप्शन ऍक्टला लोकायुक्ताचा भाग केले आहे. पाच जणांची समिती केली दोन जणांचा बेंच असणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सहा महिन्यात काय केलं विरोधक विचारत असताता. आम्ही 6 महिन्याच्या काळात भ्रष्ट्राचार विरोधी कायदा केला आहे. याच अधिवेशनात लोकायुक्ताचं बील मांडणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हंटले.
राऊतांनी ट्विट केलेला ‘तो’ व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चातला…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा वाढला होता. फडणवीस हे वागणं बर नव्ह, असेही म्हंटले होते. यावरून फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावला आहे. राऊतांनी ट्विट केलेला व्हिडीओ हा मराठा क्रांती मोर्चातला असेल, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.