हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता. परंतु मी त्यांना पुरुन उरलो. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्यांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली, तेच जेलमध्ये गेले. हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते, असे फडणवीस यांनी म्हंटले.
नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्याकडे सेवेची 20-20 आहे. मात्र, मविआने भष्ट्राचाराची 20-20 खेळली. मी यांच्या बापाला कधीही घाबरलो नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं. मात्र, मी जेलमध्ये गेलो नाही.
LIVE | प्रदेश पदाधिकारी बैठक | नाशिक | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://t.co/aViVdkSIWf
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 11, 2023
जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा यांनी एक दमडीही नुकसान भरपाई दिली नाही आणि आमच्यावर गद्दारांचं सरकार अशी टीका करत आहेत. हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते. हे सरकार बेकायदेशीर सरकार असं म्हणणारांनाच कायदा कळतो काय? जे उरले-सुरले १०-१५ आहेत, तेही जातील म्हणून विरोधक घाबरले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हा मला पूर्ण विश्वास आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.