हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी जुन्याच चेहऱ्यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली असली तरी खातेवाटप करण्यात आलेले नाही. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “खाते वाटप लवकरच होईल. कुणीही काळजी करू नये,” असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होताच त्यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे कॉलनीत कारशेडच्या मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांनी मूळात आरेमध्ये एकही झाड कापायचे नसताना कांजूरचा आग्रह धरण्याचे कारणच नव्हते. आरेतील काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. असे असतानाही केवळ इगोसाठीच कांजूरचा आग्रह धरण्यात आला होता.
कार शेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेले तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल, असे ठाकरे यांनी नेमलेल्या समितीनेच म्हंटले. मला वाटते उद्धव ठाकरे फक्त इगो करता कांजूर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.