हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत भाजपवर आरोप केले. भाजपकडून सध्या देशात मंदिर, ज्ञानवापी मशिद या मुद्यांवरून राजकारण केले जात असून त्यांच्याकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरु आहे, असे राऊत यांनी टीका केल्यानंतर यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत रोजच टीका करतात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, संजय राऊत हे रोजच टीका करत असतात. त्यांना आम्ही कुठे महत्व देतो. ते महत्वाचा माणूस नाही. संजय राऊतांच्या प्रश्नावर मी उत्तर द्यायला ते एवढे कुठे मोठे आहेत, असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.
यावेळी फडणवीसांनी ज्ञानवापी मशिदीच्या राऊतांच्या टिकेवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ज्ञानवापी मशिदसारखे हे आस्थेचे विषय असतात. देशामध्ये अस्जह प्रकारचे विषय न्यायालयाच्या माध्यमातूच सोडवले जातात. हे देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचा महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम होईल कि नाही याचा आम्ही विचार करत आहोत. ज्ञानवापी मशिद प्रकरणाचा विषय न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे त्याच्याबाबत फारसे बोलणे योग्य नाही. सेवाना हा इतिहास माहिती आहे की, कशा प्रकारे मंदिरावर आक्रमक करून ते तोडले होते.