मनसे अन् भाजपची युती होणार काय? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच दिलं ‘हे’ उत्तर

0
207
Devendra Fadnavis Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून जाहीर सभांतून भाजपचे कौतुक करत महा विकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्याच्या केल्या जाणाऱ्या कौतुकावरून आता मनसे व भाजपची युती होणार असा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान या मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा झालेली नसून असा काही प्रस्तावच आलेला नाही, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत केल्या जात असल्याच्या मनसे व भाजपच्या युतीच्या चर्चेबाबत मोठे विधान केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजप व मनसेच्या या ज्या काही युतीच्या बातम्या आहेत त्या कपोकल्पिय आहेत. राज ठाकरे व आमच्यात याबाबत अद्यापही कोणती चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र, निश्चित आहे कि राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/403327698020854/

त्यातील बहुतांश भूमिकांना मग ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पिकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहायला पाहिजे असो. या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत. म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडतो आणि तेही मांडत आहेत. पण अद्याप आमचा कोणताही युतीबाबत प्रस्ताव नाही. कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मला असे वाटते कि आता त्याच्यावर  ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतायत त्या नपकलेल्या अशा आहेत.

पेट्रोलच्या दरावरून राज्य सरकारवर साधला निशाणा

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात वाढलेल्या पेट्रोलच्या दरावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने आतापर्यंत कतीतरी पैसे पेट्रोलच्यामागे कमावून घेतले. मात्र आता दर कमी करण्याची वेळ आली तर राज्य सरकारकडून दर कमी करण्यात येत नाही. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्या गोवा, गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा जवळपास 15 रुपये कमी दराने पेट्रोल मिळते. आपल्याला का नाही? असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मुंबईतील एसी लोकलचे दर 50 टक्कांनी कमी केले

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच मुंबईतील एसी लोकल तिकिटाचे दर हे 50 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेबाबत फडणवीस यांनी माहिती दिली. याबद्दल त्यांनी केंद्राचे आणि मंत्री दानवे यांचे आभारही मानले. अव्वाच्या सव्वा तिकीट दर असल्याने मुंबईकरांनी एसी लोकलला पाठ दाखवली होती. त्यांतून सर्वसामान्यांना प्रवास परवडत नव्हता, मात्र अखेर आता प्रवासी एसी लोकलच्या प्रवासाला पसंती देतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. ​​​​​​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here