मुंबई प्रतिनिधी | काल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला कोणत्याही चर्चा चगळायच्या आहेत तर त्या चर्चा चगळू द्या. मात्र शिवसेना भाजपची युती अतूट आहे ती कधीच तुटणार नाही. आमच्यात सगळं ठरलं आहे. युती कधीच तुटणार नाही.
उद्धव ठाकरे यांनी याच कार्यक्रमात युतीमध्ये समसमान वाटा मिळण्यावर भाष्य केले. त्याच प्रमाणे सामन्यातून उद्धव ठाकरे यांनी पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असे भाष्य केले होते. या शिवसेनेच्या महत्वाकांक्षेला आज भाजपने फाटा दिला आहे. भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे त्यामुळे तेच पुढील मुख्यमंत्री असतील असे विधान केले आहे. राम कदम यांच्या विधानाने भाजपची भूमिका एका दिवसात बदलल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत आल्याने शिवसेनेचा हेका पुन्हा बंद पडला आहे. शिवसेनेला वाटत होते कि लोकसभा निवडणुकी नंतर एनडीएची सत्ता आली तर शिवसेनेला चांगली मंत्री पदे मिळतील. त्याच प्रमाणे शिवसेनेला राज्यात देखील आपले वजन वाढवतायेईल. मात्र शिवसेनेचे मनसुबे खरे ठरले नाहीत. केंद्रात भाजप संपूर्ण बहुमताने सत्तेत विराजमान झाले. त्याच बरोबर शिवसेनेचे मनसुबे देखील हवेतच विरून गेले. त्यानंतर शिवसेने आता राज्याच्या सत्तेत समसमान वाट्याचा मुद्दा समोर केला आहे. यावरून दोन्ही पक्षात आता चांगलेच शीतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.