देवेंद्र फडणवीस घेणार उद्याच मुख्यमंत्री पदाची शपथ?; ‘हे’ आहे मुख्य कारण

Sadabhau Khot Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. तर उद्या १ जुलै रोजीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे 2 जुलै रोजी हैदराबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे या कार्यकारणीची बैठकीला उपस्थित राहणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांनी शपथ घेऊन मुख्यमंत्री म्हणूनच बैठकीला उपस्थित राहावेत, यासाठी भाजपडून तयारी केली जात आहे.

फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावे म्ह्णून ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेच्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यानंतर भाजपडूनही काही व्यूहरचना आखण्यात आल्या आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्री सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीमध्ये गेले होते. त्यांच्या प्रवासासह हॉटेलमागील मुख्य कारण हे भाजपलाच ठरवले जात आहे. दरम्यान, आता भाजपकडून फडणवीस यांना उद्या म्हणजे शुक्रवारी, 1 जुलै रोजी राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.

बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या काही महत्वाच्या बैठकी आज पार पडणार आहेत. सायंकाळपर्यंत सत्तास्थापने संदर्भातील चित्र स्पष्ट होईल.