हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच मला मातोश्रीचे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला परवा एका कार्यक्रमात भेटल्या होत्या तेव्हा मी म्हटलं की उद्धवजींना नमस्कार सांगा कारण मी त्या वृत्तीचा नाही,” असे फडणवीस यांनी म्हटले.
मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे व मातोश्रीबद्दल विधान केले. यावेळी ते म्हणाले कि, “माझ्याकडून कोणत्याही स्वरूपाची कटुता नव्हती. पण मातोश्रीचे दरवाजे मला उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असे वागले. मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.
मात्र, अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी माझ्यावर केसेस टाकण्याचे, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे टार्गेट संजय पांडे यांना दिले होते. मात्र, मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत. राजकीय दृष्ट्या मी उद्धवजींचा विरोधक आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही. मी त्या संस्कारांनीच वागतो” असे फडणवीस यांनी म्हटले.