सोमय्यांच्या अश्लील व्हायरल व्हिडिओनंतर फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले की ….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील पाहिला मिळाले आहेत. सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून विधिमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे. त्यांनी मांडलेल्या भावनांशी मी अगदीच सहमत आहे. राजकारणात अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते ज्यावेळी माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्याची पुण्याई पणाला लावावी लागते. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेच्या चौकशीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, हा सर्व प्रकार आता उघडकीस आला आहे. त्यामुळे काही तक्रारी असतील तर त्या आम्हाला द्या. कोणत्याही गृहीतकांच्या आधारावर चौकशी केली जात नाही. यासंदर्भात काही ठोस पुरावे असतील तर ते आम्हाला द्या आम्ही त्याची सखोल चौकशी करू. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

याचबरोबर, “संबंधित व्हिडिओतील महिलेची ओळख उघड करता येणार नाही. फक्त या केसपुरती ओळख पोलिसांना सांगण्यात येईल. पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाची चौकशी करतील” अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तर या प्रकरणात कोणताही दबाव येणार नाही. कोणतीही लपवाछपवी चालणार नाही. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येईल” असं फडणवीस यांनी स्पष्ट सांगितल आहे.

दरम्यान सध्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. मात्र आपण कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नसल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच त्यांनी “या प्रकरणाचे सखोल चौकशी करण्यात यावी” अशी मागणी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.