“आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर…”; फडणवीसांचा राष्ट्रवादीसह शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून भाजप सोडून महाविकास आघाडी व राष्ट्रवादीवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहार. राज ठाकरे यांनी मागील दोन सभांतील भाषणांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत राष्ट्रवादी व शिवसेनेला टोला लगावला आहे.

भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या कपिल पाटील फाऊंण्डेशनच्या कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचा व्हिडीओ देखील फडणवीसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून शेअर केला आहे.

यामध्ये ते म्हणाले की, निवडणुकीमध्ये जेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबत होते तेव्हा त्यांना त्यांचे बोल गुलूगुलू वाटत होते, गुदगुल्या होत होत्या. आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर त्यांना खाजवायला होत आहे.

भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याशिवाय गप्प बसणार नाही

यावेळी फडणवीसांनी एक इशारा महाविकास आघाडी स्वरकारला दिला. ते म्हणाले की, “मला असे वाटत आहे की कुठेतरी राजयांचा घाव त्यांना वर्मी लागत आहे. भाजपाला कोणालाही समोर करायची गरज नाही. भाजपा सक्षम आहे. आम्ही पोलखोल यात्रा सुरु केलीय. या यात्रींच्या माध्यमातून रोज पोलखोल करत आहे. आमच्या या पोलखोल यात्रेने सरकार आणि सरकारी पक्ष हे इतके व्यथित झाले आहेत. त्यामुळे ते रोज आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ला करतायत. पण त्यांनी कितीही हल्ला केला तरी यांचा भ्रष्टाचाराचा पोलखोल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.