हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे वकील मंत्र्यांसोबत मिळून कट रचत आहेत. मात्र, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होत नाही. ते कधीही असे राजकारण करत नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यावर झालेली कारवाई नियमानुसारच आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूडाच्या भावनेतून कोणतीही आणि कधीही कारवाई करणार नाहीत. मात्र, महाराष्ट्रात पाहिले तर कशा प्रकारे आमच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. अधिकाऱ्यांसोबत बसून काही नेते, मंत्री कट रचत आहेत.
कशा प्रकारे प्रवीण दरेकर याच्यावर कारवाई चाललेली आहे. नसलेल्या गोष्टी कशा प्रकारे तयार केल्या जात आहेत. विरोधकांचे वकील मंत्र्यासोबतबसून आमच्या विरोधात पुरावे तयार करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हंटले.