हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचा फायदा घेत भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याच्या पार्श्वभूमीवर काल फडणवीसांनी महत्वाची घोषणाही केली होती कि, माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन. यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक सल्ला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांना सन्यास घेऊ देणार नाही. फडणवीसांसारखे होनहार नेते फकीर होण्याची भाषा करीत आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सहकार्य करावे. फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडीत सर्व व्यवस्थित सुरु आहे. हि आघाडी पक्षांची महाविकास आघाडी आहे. जो राज्याच्या, महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवत असतो. भांड्याला भाडे लागले असेल. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेची देखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गर्जना केली आहे की, तीन महिन्यांत ‘ओबीसीं’ना आरक्षण देईन; नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन. फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत? ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. याला केंद्राचे सरकार जबाबदार आहे की राज्याचे सरकार जबाबदार आहे, या वादात आता कोणीही पडू नये, अशी शिवसेनेच्या सामनामधून म्हंटल आहे.