देवेंद्रजी हा कोणता महाराष्ट्र धर्म ?? रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या उपचारामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. दमणच्या ब्रूक फार्मा या औषधं निर्माण कंपनीकडे तब्बल ६० हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.

मुंबई पोलिसांनी शनिवारी अचानक ब्रूक फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला.

या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे “की देवेंद्रजी, हा कोणता महाराष्ट्रधर्म???

रेमडीसीवीरची साठेबाजी करणाऱ्या गुजरातच्या एका फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलवलं असता राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते काही मिनिटातच त्याला वाचवायला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतात. इंजेक्शनची साठेबाजी करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांची चौकशी केली म्हणून इतकी तडफड होणं हा कुठला महाराष्ट्रधर्म?? दरम्यान,मुंबई पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ आणि केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले आहे.

You might also like