विमानात फोटो काढण्यासाठी DGCA चा नवीन आदेश, काही अटींसह मिळाली परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिव्हील एव्हीऐशन रेग्युलेटर (DGCA) ने रविवारी स्पष्टीकरण जारी करून सांगितले की, फ्लाइट्स प्रवाशांना सेल्फी घेण्यास किंवा व्हिडीओ घेण्यास कोणतेही बंधन नाही आहे. मात्र, प्रवासी विमानात कोणत्याही प्रकारचे व्यत्यय आणणारे असे कोणतेही रेकॉर्डिंग गॅझेट वापरू शकणार नाहीत. DGCA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून प्रवास करताना, प्रवासी टेकऑफ आणि लँडिंग करताना व्हिडिओ किंवा फोटोग्राफी करू शकतात.

DGCA ने शनिवारी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘आतापासून हे ठरविण्यात आले आहे की, पूर्वनिर्धारित प्रवासी विमानात असे कोणतेही उल्लंघन (फोटोग्राफी) करत असेल तर त्याला मार्गावरील प्रवासास दुसर्‍या दिवसापासून दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात येईल. ‘त्यानंतर, DGCA ने आज यावर स्पष्टीकरण जारी केले आहे.

नक्की प्रकरण काय आहे?
खरं तर, इंडिगो एअरलाइन्स (Indigo Airlines) चंदीगड ते मुंबई च्या एका विमानात कंगना रनौत (Kangana Ranaut) बरोबर काही मीडियातील व्यक्तींनी सुरक्षा आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यानंतर DGCA ने इंडिगोला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

9 सप्टेंबरच्या या विमानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही पत्रकार आणि कॅमेरामन हे कंगना रनौत हिच्याशी बोलण्यासाठी झगडत असल्याचे स्पष्ट झाले. या विमानाच्या पहिल्या लाईनमध्ये कंगना बसलेली होती.

कोणत्या नियमानुसार आदेश देण्यात आला?
शनिवारी हा आदेश विमान नियम 1937 च्या नियम 13 अंतर्गत देण्यात आला. त्याअंतर्गत कोणतीही व्यक्ती DGCA किंवा सिव्हील एव्हीऐशन रेग्युलेटरच्या परवानगीशिवाय उड्डाणात फोटोग्राफी करू शकत नाही. DGCN च्या नियमांनुसार विमान कंपन्या अशा प्रवाश्यांना थोड्या काळासाठी “no-fly list” वर ठेवू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.