जिंतूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी भाजप विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्याची भाषा कशी होती आणि आता कशी आहे याचा वस्तू पाठच शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मांडला आहे. ते शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत जिंतूर या ठिकाणी बोलत होते.
मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना बबनराव पाचपुते मंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. आता बबनराव पाचपुते भाजपमध्ये गेले आहेत. आता बबनराव भाजपमध्ये गेल्यावर पावन झाले का. जेव्हा ते राष्ट्रवादीत होते तेव्हा भ्रष्ट बबन्या होता आणि भाजपमध्ये जाताच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पवित्र झाले का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी या भाषणात भाजप भ्रष्टाचाराला कसे थारा देते याचा साक्षात्कार लोकांना आपल्या भाषणातून करून दिला. त्याच प्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत बसवण्याचे आवाहन देखील उपस्थित जनतेला केले.