सिन्नर | कांद्याचे भाव पडल्यानंतर कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने मागील आठवड्यात केली होती. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर “कांद्याला २ रुपये अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?” असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेनिमित्त सिन्नर येथील आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज सिन्नर येथील सभेतून झाली.
कांदा उत्पादक शेतकरी आज ढसाढसा रडत आहे. आंदोलनं करत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये केलेल्या चूकीबद्दल बॅनर लावून पवार साहेबांची माफी मागत आहे. त्यांच्या मालाला आज भाव नाही. दोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?#परिवर्तनयात्रा #परिवर्तनपर्व #सिन्नर pic.twitter.com/SCVV1lsEJj
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 16, 2019
“कांद्याचं उत्पादन घेणारा शेतकरी आज ढसाढसा रडत आहे. आंदोलनं करत आहेत. त्याच्या मालाला आज भाव नाही” असं म्हणून मुंडे सिन्नर येथील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा मांडली. शेतकऱ्याचा कळवळा करणारा एकही माणूस मंत्रिमंडळात नाही असे म्हणून मुंडे यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले. आज शेतकरी वर्ग गेल्या निवडणुकांमध्ये केलेल्या चूकीबद्दल बॅनर लावून पवार साहेबांची माफी मागत आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले.
‘नाशिक शहराचे नावलौकीक करणाऱ्या भुजबळ साहेबांना सरकारने कटकारस्थान करून अडकवले. त्याकाळात जर भुजबळ साहेब राजकारणात सक्रीय असते तर भाजपाचे आज अस्तित्व राहीले नसते. छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलताना पुढे ते म्हणाले, सात महिने झाले भुजबळ यांच्या छातीत का दुखत नाही? असा मेसेज भाजपाच्या सोशल मीडिया गोटातून वायरल होत आहे. ही अंत्यत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणाची इतकी खालची पातळी कोणी गाठली नव्हती. आम्ही तुमच्या प्रत्येक कारस्थानाला पुरून उरू. राष्ट्रवादीचा कोणी नाद करायचा नाही.’ असे आव्हानही मुंडे यांनी सरकारला दिले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर
राहुल गांधी, अरविंद केजरीवाल शेतकर्यांसोबत दिल्लीच्या रस्त्यांवर
शेतकऱ्यांना आम्ही दिलेली मदत त्यांना कमीच वाटणार, सदाभाऊ खोत यांचा राज ठाकरे, जयंत पाटील यांना टोला
कांदा उत्पादक शेतकरी आज ढसाढसा रडत आहे. आंदोलनं करत आहेत. गेल्या निवडणुकांमध्ये केलेल्या चूकीबद्दल बॅनर लावून पवार साहेबांची माफी मागत आहे. त्यांच्या मालाला आज भाव नाही. दोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का?
सात महिने झाले अजून भुजबळ यांच्या छातीत का दुखत नाही, असा मेसेज भाजपाच्या सोशल मीडिया गोटातून वायरल होत आहे. ही अंत्यत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणाची इतकी खालची पातळी कोणी गाठली नव्हती.#परिवर्तनयात्रा #निर्धार_परिवर्तनाचा #सिन्नर @ChhaganCBhujbal pic.twitter.com/giCoD4J9dW
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 16, 2019