मी कधीच ठाकरे कुटुंबाबद्दल चुकीचं भाष्य करणार नाही; धैर्यशील माने स्पष्टच बोलले

Dhairyasheel Mane Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे ट्विट व्हारयल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर सिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. त्यांच्यानंतर आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. “माझ्या हातात आजही उद्धव ठाकरे यांनीच बांधलेलं शिवबंधन आहे. त्यामुळे ते असो अथवा आदित्य ठाकरे असो किंवा ठाकरे कुटुंब यांच्या विरोधात मी कधीही चुकीचं भाष्य करणार नाही. ठाकरे घराण्याचा आम्हाला नेहमीच आदर राहील, असे माने यांनी स्पष्टच सांगितले.

शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर खा. धैर्यशील माने यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमचं पाऊल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही, आघाडी विरोधात आहे. आजही माझ्या हातातलं शिवबंधन उद्धव ठाकरे यांनी बांधलेलं आहे. ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच आमचा प्रयत्न होता. आमचा लढा सर्व सामान्य शिवसैनिकांसाठीच आहे. ठाकरे कुटुंबियांशी माझा जिव्हाळा कायम कायम असेल.

खासदारांना उद्धव ठाकरेंना सोडायचं नव्हतं – माने

यावेळी खा. माने यांनी शिवसेना खासदारांबाबत म्हत्वाचाही विधान केले. आम्हा खासदारांना उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं. आम्ही सगळे त्यांना जाऊन भेटलो. त्यांना आमच्या समस्या सांगितल्या. राजकीय परिस्थितीही त्यांच्या लक्षात आणून दिली. पण राज्यात जी आघाडी झाली होती ती अनैसर्गिक होती, असे माने यांनी म्हंटले.

संजय शिरसाट काय म्हणाले?

शिंदे गटाचे बंडखोर आ. शिरसाट यांनी काल रात्री एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख केला होता. त्यामुळे शिरसाट हे शिंदे गटात नाराज असल्याची चर्चाही झाली. त्यामुळे शिरसाट यांनी ते ट्विट डिलीट केले. आणि माध्यमांशी संवाद साधत मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे जुनं ट्विट व्हायरल झाल्याचे शिरसाट यांनी सांगितले. तसेच आपल्याला कॅबिनेट आणि औरंगाबादचं पालकमंत्रीपद हवं आहे. तशी मागणी आपण शिंदे यांच्याकडे केली असून आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे शिरसाट म्हणाले.