शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर धोनी अजूनही भारतीय संघासाठी खेळू शकतो – गौतम गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2019 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ फलंदाजी हा चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चाही रंगली होती. परंतू धोनीने अद्याप निवृत्तीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.अनेक माजी खेळाडूंनी धोनीने आता निवृत्त व्हावं असा सल्ला दिला होता. परंतू भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरच्या मते धोनी जर शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर तो भारतीय संघासाठी खेळू शकतो.

गंभीर म्हणाला,”माझ्यामते वय हा एक आकडा आहे. जर धोनी चांगल्या फॉर्मात असेल आणि नेहमीप्रमाणे चांगली फलंदाजी करत असेल तर तो भारतीय संघाकडून नक्कीच खेळू शकतो. माझ्या मते त्याने भारतीय संघासाठी खेळत रहावं कारण त्याला कोणीही निवृत्तीसाठी दबाव टाकणार नाही. भारतीय संघात सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी धोनी अजुनही उपयुक्त ठरु शकतो. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता त्यावेळी तो तुमचा निर्णय असतो. त्याचप्रमाणे निवृत्तीचा निर्णयही तुमचाच असला पाहिजे. यासाठी कोणत्याही खेळाडूवर दबाव टाकता येत नाही.”

आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये आयोजित करण्याची तयारी बीसीसीआयने सुरु केली आहे. त्यामुळे धोनीचे चाहते पुन्हा एकदा त्याला मैदानात पाहू शकणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment