मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात मागच्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात (temperature) घट होण्याची शक्यता आहे. या थंडीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान (temperature) कमालीची घट झाली आहे.
कुठे कुठे झाली तापमानात घट?
महाबळेश्वरमध्ये तापमानात (temperature) मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. तर धुळ्याच्या वेण्णालेक परिसरात 5 अंशांची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातदेखील तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नाशिकमध्येही थंडीची चाहूल लागण्यास सुरूवात झाली आहे. सध्या हुडहुडी भरणारी थंडी असल्याने लोकांची अनेक कामे खोळांबली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरत आहे. मेंडोस चक्रीवादळामुळे कोकणातील काही भाग सोडता राज्यातील इतर भागात थंडीची चाहुल पुन्हा लागली आहे. तसेच काही ठिकाणी रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदात आहे.
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या