हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण झोपायचा विचार करतो तेव्हा बहुतेक लोक पलंगावर अगदी आरामशीर झोपायला आपली पसंती देतील. सध्याच्या धावपळीच्या जगात, ऑफिस मधील काम, दगदगीचा प्रवास किंवा मानसिक त्रास यातून थोडाफार आराम मिळवण्यासाठी कधी एकदा घरी जातोय आणि बेड वर पाठ टेकतो असं काहीजणांना होत. पण तुम्हाला हे माहित आहे का ? कि बेडवर झोपण्यापेक्षा जमिनीवर झोपण्याचे भरपूर आरोग्यदायी फायदे आहेत. हे फायदे बघितले तर तुम्ही बेड वर झोपायचंच विसरून जाल.. चला याबाबत अधिक जाणून घेऊया.
कंबरदुखीचा त्रास होत नाही-
आजकाल अनेकांना कंबरदुखीने ग्रासले आहे. बदललेली जीवनशैली, एका जागी सतत बसने, अपुरी हालचाल यामुळे अलीकडे कंबरदुखीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच जर तुम्ही बेडवर झोपला तर हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जमिनीवर झोपला तर हा त्रास नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
श्वासोच्छवास सुधारतो –
श्वासोच्छवास हि आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. सरळ जमिनीवर पाठ टेकून झोपल्यास श्वासोच्छ्वास सुधारण्यास मदत होते. थेट पाठीवर जमिनीवर पडल्याने प्राणवायू संपूर्ण शरीरात प्रवास करतो. प्राणवायूची पातळी व्यावस्थित राखली जाते आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते.
शरीराला थंडावा मिळतो-
जेव्हा तुम्ही गुबगुबीत गादीवर झोपता तेव्हा ओव्हर हिटिंगमुळे तुम्हाला शांत झोप येत नाही. मात्र जर तुम्ही साधं पांघरून टाकून जमिनीवर झोपलात तर शरीराचे तापमान संतुलित होऊन. अतिरिक्त ताप जमीन शोषून घेते. ज्यामुळे शरीर थंड होऊन निवांत झोप लागते.
ताणतणाव कमी होतो-
तुम्हाला वाटेल की, जमिनीवर झोपण्याचा आणि ताणतणावाचा काय सबंध ? मात्र ताणतणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जमिनीवर झोपणं तुमच्या फायद्याचं ठरतं. कारण असे जमिनीवर झोपल्याने शांतता मिळते. ज्यामुळे मनातील तणाव दूर होतो.
रक्तप्रवाह सुधारतो-
शारीरिक क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत असायला हवा. तज्ञ सांगतात कि, जमिनीवर झोपल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो. म्हणूनच जमिनीवर झोपणे फायदेशीर आहे.
पाठीचा कणा सुधारतो-
ऑफिसमध्ये एकाच जागी काम करत बसण्यामुळे अनेकांना मणक्याचा त्रास उदभवतो. त्यातच जर तुम्ही जर गादीवर झोपला तर मणक्याला ते आणखी जड जाते आणि त्याचा परिणाम थेट मेंदूच्या नसांवर होतो. म्हणून ही समस्या दूर करण्यासाठी महागड्या गादीवर नव्हे तर जमिनीवर झोपा. यामुळे स्नायूंमधील वेदना कमी होऊन पाठीचा कणा मजबूत होतो.