हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Tax Slab vs Old Tax Slab : नोकरदार वर्गाला दरवर्षी अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. खास या वर्गाला इन्कम टॅक्समध्ये सवलतीची अपेक्षा असते. मात्र 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी टॅक्स स्लॅबमध्ये थोडासा बदल केला आहे. संसदेत आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, “नवीन सिस्टीम अंतर्गत सूट वाढवण्याचा प्रस्ताव आला आहे. ज्या अंतर्गत, जर एखाद्याचे उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.”
तर आज आपण नवीन टॅक्स स्लॅब आणि जुन्या टॅक्स स्लॅबमधील (New Tax Slab vs Old Tax Slab) फरक समजून घेउयात , जेणेकरून आपल्याला किती उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल हे कळू शकेल.
असा आहे जुना टॅक्स स्लॅब (New Tax Slab vs Old Tax Slab)
जुन्या टॅक्स सिस्टीमनुसार 2.5 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स भरावा लागत नव्हता.
याआधी 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स भरावा लागत होता.
तसेच 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के टॅक्स आकारला जात होता.
त्याच प्रमाणे 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के दराने टॅक्स आकारला जात होता.
10 लाखांपेक्षा जास्त वैयक्तिक उत्पन्नावर 30 टक्के दराने टॅक्स आकारला जात होता.
असा आहे नवीन टॅक्स स्लॅब (New Tax Slab vs Old Tax Slab)
3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही.
3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स भरावा लागेल.
6-9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के टॅक्स भरावा लागेल.
9 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के दराने टॅक्स आकारला जाईल.
12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स भरावा लागेल.
15 लाख आणि त्याहून जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स भरावा लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal/
हे पण वाचा :
Union Budget 2023 : पर्यटनसाठी खास तरतूद; स्वदेश दर्शन योजनेसह युनिटी मॉल बद्दल अर्थमंत्र्यांचे मोठे निर्णय
Union Budget 2023 : काय स्वस्त अन् काय महाग?? पहा एका Click वर
Budget 2023 : सरकारकडून नागरिकांना भेट, आता मोबाईल, टीव्ही, कॅमेरा आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती होणार कमी
Gold Price Today : अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर
Railway Budget 2023 : रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचे बजट, 2013 च्या अर्थसंकल्पापेक्षा 9 पटींनी जास्त