Wednesday, October 5, 2022

Buy now

“हा तर कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न”; ‘द काश्मीर फाईल्स’बाबत वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत आज मुंबईतील अधिवेशनात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाचे विधान केले. ‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

आज मुंबईत विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘द काश्मीर फाईल्स’बाबत आपली भूमिका मंडळी. यावेळी ते म्हणाले की, अशा याप्रकारच्या चित्रपटांतून एक प्रकारे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकताच झुंड हाही चित्रपट प्रदर्शित झाला. लंकाहीनी तर हा चित्रपट टॅक्स फ्री धाखवण्याची मागणी केली जात आहे. अशा प्रकारचे चित्रपट दाखवून समाजा समाजामध्येतेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असे वळसे पाटील यांनी म्हंटले.

“द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट आला आहे. तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी केली जात आहे. भाजप नेत्यांनी मागणी केल्यानंतर आता झुंड हाही चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहार. अशा याप्रकारच्या चित्रपटातून वातावरणात एक प्रकारे सनसनाटी निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे वळसे पाटील यांनी म्हंटले.