हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सागर बंगल्यात पोलिसांकडून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी केली. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. “पोलीस बदल्यांचा अहवाल लीक प्रकरणी फडणवीसांची एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक यांच्या चौकशी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाच ते सहावेळा नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान त्यांनी सभागृहात एक पेन ड्राइव्ह सादर केला. त्यावरून फडणवीस यांच्याकडे हि माहिती लिक कशी झाली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्नावलीची उत्तरे न आल्याने फडणवीसांची आज चौकशी करण्यात आली असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज देवेंद्र फडणवीस याची चौकशी केली जात आहे. तसेच त्यांना जी नोटीस पाठवण्यात आली आहे ती आरोपी म्हणून नोटीस बजावण्यात आलेली नाही. या प्रकरणात फडणवीसांचा जबाब महत्त्वाचा आहे. फडणवीसांच्या जबाबामुळे तपास थांबला होता. त्यामुळे पोलीस जबाब नोंदवण्यासाठी फडणवीसांच्या घरी गेले.
या प्रकरणात पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2021 रोजी दाखल झाला आहे. अज्ञात इसमानं राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गोपनीय माहिती प्राप्त केली. राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यानं हा गुन्हा नोदं करण्यात आला होता. भारतीय टेलिग्राफ कायदा, गोपनीयता कायदा याअतंर्गत गुन्हा दाखळ झाला होता. आतापर्यंत 26 जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. यापूर्वी फडणवीस यांना नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांना प्रश्नावली पाठवली होती. प्रश्नावलीची उत्तर त्यांनी दिली नव्हती, असे वळसे पाटील यांनी म्हंटले.