IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास

0
120
Hardik And Dinesh Kartik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही रणनीती आखली आणि त्याचा परिणाम कालच्या सामन्यात दिसून आला. सामनावीर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याने 16 वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. या सामन्यात आवेश खानने उत्तम कामगिरी करत भारताने 82 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आवेश खानने 18 धावांत 4 विकेट घेतले. आता 19 जून रोजी बंगळुरू येथे होणारा पाचवा टी-20 सामना निर्णायक होणार आहे.

रिषभ पंत काय म्हणाला ?
युवा कर्णधार ऋषभ पंत सामना संपल्यानंतर “आम्ही रणनीतीबद्दल बोललो आणि निकाल तुमच्यासमोर आहे.” कार्तिक (Dinesh Kartik) आणि हार्दिक पांड्या यांच्यातील भागीदारीबद्दल बोलताना पंत म्हणाला, “खरोखरच मी खूष आहे, कारण दोघांच्या फलंदाजीने आफ्रिकन गोलंदाजांवर दबाव दिसत होता.

हार्दिक पांड्याच्या सल्ल्याने कार्तिकचा खेळ बदलला
या सामन्यानंतर दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) म्हणाला, “खूप छान वाटत आहे. शेवटच्या सामन्यात परिस्थिती चांगली चालली नव्हती. पण आता मी परिस्थितीचे अधिक चांगल्या पद्धतीने आकलन करू शकलो आहे. हे नियोजन आणि अनुभवातून येतं. कार्तिक (Dinesh Kartik) म्हणाला, “त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीला शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे आमचे सलामीवीर चालले नाहीत. मी फलंदाजीसाठी आलो तेव्हा हार्दिकने मला क्रीजला चिकटून राहण्याचा सल्ला. आमची योजना यशस्वी झाली.” असे दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) म्हणाला.

हे पण वाचा :
PNB ने ग्राहकांना दिला धक्का, आता पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेमेंटवर मिळणार नाही कोणतीही सूट !!!

वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

ENG vs NED : इंग्लंडने वनडे मध्ये 498 रन करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

सध्याच्या घसरणीच्या काळात 100 टक्क्यांहून जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ शेअर्सवर एकदा नजर टाकाच !!!

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी रेल्वेला आग लावली तसेच स्टेशनवरील स्टॉलही लुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here