काँग्रेस आमदाराच्या वाढदिवसानिमित्त मोफत पेट्रोलचे वाटप; कुठे आहे हा उपक्रम?

Birthday Congress Praniti Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हंटलं कि मतदारसंघात अनेक उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जेवणावळी घातल्या जातात. पण राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या शिंदे कुटूंबातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस एका वेगळ्या उपक्रमामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आज आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्त सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील प्रणिती नाव असलेल्या महिला आणि युवतींना मोफत 1 लीटर पेट्रोल वाटप करण्याचा उपक्रम राबविला आहे.

एका महिला नेत्याच्या वाढदिवशी त्यांच्या नावाने असलेल्या इतर महिलांनाच मोफत एक लिटर पेट्रोल वाटपाच्या या उपक्रमाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होत आहे. उपक्रमाची माहिती मिळताच प्रणिती नावाच्या मुली, महिलांकडून सोलापूर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे.

सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्यावतीने राबविलेल्या या उपक्रमाचे महिला वर्गातून कौतुक केले जात आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांना महिलांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत.