हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भिंडचे जिल्हाधिकारी छोटे सिंह यांनी कोरोना संक्रमित जिल्ह्यातील इंदूर, भोपाळ , उज्जैन आणि देशातील इतर राज्यांतल्या हॉट स्पॉट जिल्ह्यांमधून आलेल्यांच्या माहिती देण्यासाठी ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जिल्ह्यातील लोकांना कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या हद्दीवर दक्षता वाढविण्यात आलाली असून बाहेरून येणाऱ्यांची तपासणी सीमेवरच केली जात आहे.जिथे बाहेरील लोक जिल्ह्यात येतील अशी अपेक्षा आहे.राज्यात कोरोना संसर्ग रोखणे आव्हानात्मक होत आहे. हळूहळू हा संसर्ग २५ जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. हे पाहता त्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक सतर्क झाले आहेत,जिथे आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक लॉकडाऊनचे काटेकोरपणे अनुसरण करण्याबरोबरच कोरोना जिल्ह्याच्या हद्दीत येण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. भिंड या सीमावर्ती जिल्ह्यात संक्रमणाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी छोटे सिंह यांनी या साथीच्या आजाराने ग्रासलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची माहिती दिल्यावर बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, सचिव, अंगणवाडी सेविकासह अन्य सरकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तरीही लोक छुप्या पद्धतीने जिल्ह्याच्या हद्दीत शिरण्याचा धोका आहे. हे पाहता बक्षीस जाहीर केले आहे. सिंह म्हणाले की, चौकीदार किंवा पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोणीही बाहेरील लोकांविषयी माहिती देऊ शकेल. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की ३०हजाराहून अधिक कामगार जिल्ह्यात परत आले आहेत.त्या सर्वांची तपासणी करण्यात आली आणि सर्वाना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.
हा कालावधीही पूर्ण झाला आहे.आता कोणताही नवीन धोका घेऊ शकत नाही आहोत, म्हणून गरज पडल्यास याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल. तसे, जिल्ह्यातील लोक पूर्ण सहकार्य करीत आहेत. तथापि, बाहेरील लोकांच्या येण्याची माहिती कोणी लपवून ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासह जिल्हा प्रशासन लवकरच टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून या क्रमांकावर संशयितांची माहिती देता येईल.तोपर्यंत आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन ५५० जागांसाठी भरती जाहीर@mybmc #jobsearch #Careernama #करिअर #Career https://t.co/Rq52K8qrCh
— Careernama (@careernama_com) April 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..
सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण
खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in