हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेवरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर जर कोणाला अल्टीमेटम द्यायचा असेल तर तर तो आपल्या घरातल्याना द्या अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य करताना भोंग्या वरून राज ठाकरेंवर निशाणा साधला.
अल्टीमेटमची भाषा कोणीही वापरू नये. ही हुकुमशाही नाही. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे गोष्टी होतील. कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. जर कोणाला अल्टीमेटम द्यायचाच असेल तर तर तो आपल्या घरातल्याना द्या अस म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारले.
दरम्यान, उत्तरप्रदेश येथील जहांगीरपुरी येथे जातीय दंगलीनंतर उत्तर प्रदेशात गोरखपूर येथील गोरख मठावरील भोंगे उतरवले. त्यानंतर अनेक मंदिरं व मस्जिदीवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन केले होते. अनेकांनी स्वत;हून भोंगे उतरवले. त्याबाबत राज्य सरकारने आदेश काढला नव्हता, असं अजित पवार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.