कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत का आदानी अंबानीच्या फायद्याचे आहेत? असा जळजळीत सवाल यावेळी सत्वशीला चव्हाण यांनी केला. कराड येथील कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलनात त्या आज सहभागी झाल्या होत्या.
शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? एसी मध्ये बसून शेतकऱ्यांसाठी कायदे करणारे यांचे शेतीतील ज्ञान अल्प असल्याची टिका सत्वशीला चव्हाण यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.