मुंबई : हॅलो महाराष्ट्र – संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र जे फुटीर 40 आमदार आहेत त्यांच्या कुत्र्यांना आणि मांजरांनाही Y+ सुरक्षा (Y+ Security) देण्यात आली असल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. राजन विचारे यांनी हायकोर्टात जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते योग्यच आहेत असेदेखील संजय राऊत म्हणाले आहेत.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
माझ्यासारख्या नेत्याची सुरक्षा पूर्णपणे काढली आहे. कोणत्या नियमाने ती सुरक्षा काढली. आमच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. मात्र जे फुटीर आमदार आहेत त्यांच्या घरातल्या कुत्र्यांना आणि मांजरांनाही वाय प्लस सुरक्षा (Y+ Security) प्रदान करण्यात आली आहे. हे सगळं कोणत्या नियमाने सुरू आहे? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मी जी माहिती घेतली त्यात फुटीर आमदारांना एकेकाला चाळीस सुरक्षा रक्षक आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे नोकर, त्यांच्या घरातले कुत्रे, मांजरी यांनाही सुरक्षा प्रदान कऱण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातली सुरक्षा पाहिली की मला प्रश्न पडतो कारण एवढी फौज देशाच्या सीमेवर किंवा चौकीतही नाही. यामुळे राजन विचारे यांनी मांडलेला मुद्दा योग्य असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
राजन विचारे यांची भूमिका?
कोणत्याही ठोस कारणाशिवाय सुरक्षा कमी (Y+ Security) करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात राजन विचारे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. तसंच आपली सुरक्षा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. ठाकरे गटाशी संबंधित खासदार-आमदारांना धमकवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. राज्य सरकार राज्यातील राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहे, असा आरोपदेखील राजन विचारे यांनी केला आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!