भाजपाचा ‘हा’ खासदार आपला खासदारकीचा संपूर्ण पगार देणार लोककार्यासाठी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |आपल्या समाजकार्याने सतत इतरांना प्रेरणा देणारे आणि दिल्लीतून लोकसभेवर खासदार असणारे भारतीय क्रिकेट टीमचे माजी फलंदाज गौतम गंभीर आपला संपूर्ण पगार दिल्लीमधील स्मशानभूमीच्या कामासाठी देणार आहेत.क्रिकेटमध्ये फटकेबाजी करणारे गंभीर हे राजकीय पटलावर देखील चांगलीच फटकेबाजी करत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सुरुवातीला ते कमीच राजकीय टिप्पणी देत होते. मात्र आता त्यांनी राजकीय भाष्य करायला देखील सुरुवात केली आहे.

मागील काही दिवसापूर्वी खासदार गौतम गंभीर यांनी आपल्या मतदारसंघातील गीता कॉलनी येथील स्मशान भूमीला भेट दिली. भेट दिल्यानंतर त्यांनी येथील दुरावस्था पाहून आपला पगार येथील स्मशान भूमीला देण्याचे ठरवले. त्यानंतर गौतम गंभीर यांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्वच स्मशान भूमी सुधरवण्याचा विडाच उचलला. त्यांनी सर्व स्मशान भूमींची पाहणी करून विकास कामांचे नियोजन आखले आहे.

९ जुलै रोजी ट्विट करुन मी खासदार म्हणून मला मिळणारा पगार समाजकार्यासाठी देणार असल्याचे म्हटले होते. राजकारण हे शहरातील लोकांची मदत करण्यासाठी मी निवडलेला एक मार्ग आहे. त्यामुळेच, एक खासदार म्हणून मला मिळणारा पगार मी, माझ्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी आणि सुख-सुविधांसाठी वापरणार असल्याचे गौतमने ट्विट करुन म्हटले आहे. त्यामुळेच ईस्ट दिल्लीच्या विकासासाठी, येथील स्मशान भूमीच्या पुनर्निर्माणासाठी या पैशाचा वापर केला जाईल, असेही गौतमने म्हटले आहे.

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला

 

Leave a Comment