हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. तत्पूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यानाही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही समावेश आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला आहे. “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयशाची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे, असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्थार कार्यक्रम पार पडला. यावेळी ४३ भाजप नेत्यांनी शपथ घेतली. मोदींच्या शपथविधीवरून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शपथविधी पार पडत असताना महत्वाचे ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
डॉ हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयश व लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्धवस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे.
असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 7, 2021
सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहे कि, “डॉ. हर्षवर्धन यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आल्याने कोरोना हाताळण्यात आलेले अपयश व लाखो लोक मरण पावले, अनेकांचे संसार उद्धवस्त केल्याला जबाबदार असल्याची कबुली मोदी सरकारने दिली आहे. असो, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातून मविआ सरकार आधी होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले आहे.” असे सावंत यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दिल्लीत भाजप नेते नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “काँग्रेसने अनेकवेळा नारायण राणे यांना शब्द दिला. मात्र, तो पूर्ण केला नाही. बारा वर्षे काँग्रेसला समजलं नाही ती भाजपला दीड वर्षात समजले. जे काँग्रेसने करून दाखवलं नाही ते भाजपने ते करून दाखवलं,” असा टोला निलेश राणेंनी काँग्रेसला लगावला. राणेंच्या टीकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार व डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.