हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात घसा कोरडा पडणे आणि वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण प्लॅस्टिकची मिनरल वॉटरची बाटली घेत असतो. परंतु हे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल्स आणि बॅक्टेरिया भरलेले असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात.
एका संशोधनानुसार, प्लास्टिकमध्ये असलेले केमिकल्स केवळ पाणी दूषित करत नाहीत तर ते आपले आरोग्यासही हानिकारक बनवतात. हानिकारक केमिकल्स व्यतिरिक्त, प्लास्टिक फ्लोराइड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियमसारखे पदार्थ देखील बाहेर सोडत. हे पदार्थ मानवी शरीरासाठी विषारी असतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे म्हणजे तुम्ही आरोग्याला स्लो पॉइझन दिल्यासारखं आहे.
प्लास्टिक गरम वातावरणात वितळते. गाडी चालवताना आपण अनेकदा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी घेऊन जातो. बर्याच वेळा ते कारमध्ये तशीच राहते आणि त्यावर सूर्याचा प्रकाश पडतो. अशा प्रकारे बाटली गरम झाल्याने डायऑक्सिन नावाचे विष तयार होते. जे सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
प्लास्टिकमध्ये phthalates नावाचे केमिकल्स असते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते तसेच शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.
प्लास्टिकच्या बाटली मधील पाणी पिल्यामुळे गंभीर आजारांचा धोका तर वाढतोच, पण त्याचसोबत आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा वाईट परिणाम होतो. वास्तविक, प्लास्टिकमध्ये असलेली हानिकारक रसायने पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे तुम्हीही जर प्लास्टिकच्या बाटली मधून पाणी पित असाल तर आजच सावध व्हा आणि आपलं आरोग्य जपा.