नवी दिल्ली । Driving License, आर सी (RC), इन्शुरन्स (Insurance) आणि वाहनांशी संबंधित कागदपत्रांच्या रिन्यूअलची अंतिम तारीख 30 जून आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) आता पुन्हा ही तारीख न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेने सर्वांना घाबरवले आहे. अशा परिस्थितीत आपण आपले वाहन चालविण्याचे लायसन्स रिन्यूअल करू इच्छित असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि रिन्यूअलसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली गेली आहेत. ज्या अंतर्गत आता आपण घरबसल्या वाहन चालविण्याचे लायसन्स मिळवू शकता.
Driving License ची प्रक्रिया झाली ऑनलाईन
नव्या नियमानुसार, लर्निंग लायसन्ससाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. ज्यामध्ये एप्लीकेशनपासून प्रिंटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल. याव्यतिरिक्त, मेडिकल सर्टिफिकेट्स, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याचे रिन्यूअल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट्स आणि डॉक्यूमेंट्स वापरली जाऊ शकतात.
RC रिन्यूअलसाठी सुविधा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लोकांच्या सोयीसाठी नवीन वाहन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया देखील सुलभ केली आहे. यासह, आपण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यूअल आता 60 दिवस अगोदर मिळवू शकता. या व्यतिरिक्त तात्पुरत्या रजिस्ट्रेशनची मुदतही 1 महिन्यापासून 6 महिने करण्यात आली आहे.
ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओकडे जाण्याची गरज नाही
यासोबतच सरकारने Learner’s License साठीही काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओकडे जाण्याची गरज भासणार नाही, हे काम ट्यूटोरियलच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन करता येईल. हे पाऊल कोरोना साथीच्या काळात मोठा दिलासा देणार आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group