माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला DRDO चा अत्याधुनिक ड्रोन कोसळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादाच्या दरम्यान डीआरडीओने (संरक्षण संशोधन व विकास संघटना) भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित ‘भारत’ ड्रोन प्रदान केले आहेत. जगदलपुर येथील दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDO च्यावतीने देण्यात आलेला अत्याधुनिक ड्रोन रविवारी अचानक कोसळला. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. दंडकारण्यात बस्तर आणि इतर राज्याच्या सीमावर्ती भागातील माओवाद्यांच्या हालचालीसाठी केंद्रीय गृहमंञालयाकडून हा ड्रोन मागवण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अत्याधुनिक तंञज्ञानाने सुसज्ज असा बनविलेला मोठया आकाराचा ड्रोन छत्तीसगडच्या माओवादप्रभावीत जगदलपुरला पाठवण्यात आला होता. डीआरडीओच्या ताब्यात असलेल्या या ड्रोनची चाचणी सुरु होती. शहराभोवती एक फेरी मारून जगदलपुरच्या विमानतळावर लँडिंग करताना हा ड्रोन धावपट्टीवर न उतरता एका भिंतीवर जाऊन आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की भिंतही तुटली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी ड्रोनचे अवशेष एका गाडीवर लादून पुन्हा विमानतळावर आणले. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. इतक्या अत्याधुनिक ड्रोनचा असा अपघात झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या भागात सुरक्षादलांकडून लवकरच नक्षलविरोधी मोहीम हाती घेण्यात येणार होती. या सगळ्यात ड्रोनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार होती. मात्र, आता हा ड्रोनच कोसळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डीआरडीओने हा ड्रोन विकसित केला होता. हा ड्रोन अत्याधुनिक बनावटीचा होता. त्यामुळे आकाशातून नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येणार होती. अपघाताच्यावेळी NTRO चे दोन-तीन अभियंते हा ड्रोन ऑपरेट करत होते. मात्र, कोणाच्या चुकीमुळे हा अपघात झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Comment