हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकराणानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रगचा खेळ सुरू असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. सध्या तुरुंगात असलेला एक ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा आहे. फडणवीस आणि ड्रग याची न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. तसेच याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी म्हंटल.
Details of 'River Song' which shows Jaydeep Rana as Finance Head.
Song sung by Ms. Amruta Fadnavis
Video shows Devendra Fadnavis and Sudhir Mungatiwar as actorshttps://t.co/LddkleoTaQ pic.twitter.com/lWnq2d4wF6— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. गुंडेच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांचं मायाजाल चालायचं असं नवाब मलिक म्हणाले आहेत. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे