बीड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बीडमध्ये अशीच एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महावितरणने (Mahavitran) वीज कनेक्शन कट केल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करत विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
महावितरणने (Mahavitran) ऐन हंगामात वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्याचे रब्बी हंगामातील पीक जळून जात आहे. आता पीक वाचवू कसे, या विवचनेतून आता सर्व संपलं म्हणत एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक गावामध्ये हि घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नारायण भगवान वाघमोडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच या शेतकऱ्याची आठ दिवसापासूनच मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. तसेच जर नारायण वाघमोडे यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला महावितरण (Mahavitran) जबाबदार असेल, असा आरोपदेखील नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!