हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद हा विकोपाला गेला आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गत मुंबई महापालिका निवडणुकीत अमित शहा यांच्या मुळेच शिवसेनेसाठी सत्ता सोडली होती अस त्यांनी म्हंटल आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अमितभाईंनी सांगितले म्हणून मुंबई महापालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे दिली. अन्यथा मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. दोन सहा नगरसेवक हे सहज इथे तिथे गेले असते. पण आम्ही उपमहापौरही दिला नाही, ना स्थायी समिती किंवा कोणत्याच समितीची मागणी केली नाही.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारने गांधी पुतळ्याजवळ केलेल्या आंदोलनावर आक्षेप घेतला. मराठा आंदोलक असो की ओबीसी आंदोलक यांना मंत्रालयाच्या परिसरात फिरकू दिले जात नाही. त्यांना नियम आणि कायदे दाखवले जातात. मग मंत्र्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलने कशी केली? त्यांना नियम आणि कायदे लागू होत नाही का? असा सवाल करत या मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार आहे का? याची चौकशी केलीच पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.