नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. लॉकडाउन लागू करून पन्नासहून अधिक दिवस होऊन सुद्धा कोरोनाचा वेग मंदावला नाही आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यानं १ लाखांचा टप्पा पार करून कोरोनाचा मुक्काम देशात आणखी काही दिवस राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. या सर्व चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये २ हजार ३५० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या बरे झालेल्या आकड्यांना जोडून संपूर्ण देशात आत्तापर्यंत ३९ हजार १७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
भारतात सध्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ही ३८.७३ टक्के इतकी आहे असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गण्यात आलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे. असं असलं तरीही आत्तापर्यंत ३९ हजार १७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात मिळाल्यानं आरोग्य यंत्रणांना याचं श्रेय जातं.
During the last 24 hours, a total of 2,350 #COVID19 patients have been cured. Thus, so far, a total of 39,174 patients have been cured of COVID-19. This means a recovery rate of 38.73% amongst COVID-19 patients. The recovery rate is improving continuously: Ministry of Health pic.twitter.com/6chjPsLOaj
— ANI (@ANI) May 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”