हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amul : जर आपण नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये फ्रँचायझी घेऊन एका महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येऊ शकेल. या फ्रँचायझीची सर्वात खास बाब अशी कि, इतर कंपन्यांप्रमाणे ही कंपनी आपल्या फ्रँचायझीकडून रॉयल्टी किंवा प्रॉफिटमध्ये शेअरिंग घेत नाही. अशा प्रकारे याद्वारे आपल्याला जास्त नफा मिळवविण्याची संधी मिळेल.
तर आज आपण अमूलच्या फ्रँचायझी बाबत चर्चा करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 2 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करून Amul ची फ्रँचायझी घेता येईल. मात्र, यासाठी कंपनीने निश्चित केलेल्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. उदाहरणार्थ, यासाठी आपले दुकान मोक्याच्या जागी किंवा बाजारात असावे. याबरोबरच कोणती फ्रँचायझी घ्यायची आहे यावर दुकानाचा आकार अवलंबून असेल. हे जाणून घ्या कि, अमूलकडून 2 प्रकारच्या फ्रेंचायझी ऑफर केल्या जातात. चला तर मग याबाबतची माहिती सविस्तरपणे जाणून घेउयात.
फ्रँचायझीबाबत जाणून घ्या
Amul आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर आणि अमूल किओस्क असे फ्रँचायझीचे मुख्य प्रकार आहेत. यामध्ये, अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरचा आणखी एक प्रकार देखील आहे. या दोन्हीच्या उभारणीचा खर्चही स्वतंत्रपणे येतो. यासोबतच त्यांच्यासाठी दुकानाचा आकारही बदलतो. जर आपल्याला अमूलचे आउटलेट हवे असेल तर 150 स्क्वेअर फूट जागा लागेल. तसेच, आईस्क्रीम पार्लरसाठी ही किमान जागा 300 चौरस फूट असावी लागेल. ही अट पूर्ण न केल्यास अमूल कडून फ्रँचायझी दिली जाणार नाही.
किती खर्च येईल ???
Amul आउटलेट उघडण्यासाठी नॉन-रिफंडेबल सिक्योरिटी म्हणून 25,000 रुपये द्यावे लागतील. याशिवाय रिनोवेशनसाठी 1 लाख रुपये तर उपकरणांसाठी 75 हजार रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे आउटलेट उघडण्यासाठी 2 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये Amul आइस्क्रीम पार्लरची किंमत जास्त असेल. यासाठी सिक्योरिटी म्हणून 50,000 रुपये द्यावे लागतील. तसेच रिनोवेशनसाठी 4 लाख रुपये तर उपकरणांसाठी 1.50 लाख रुपये द्यावे लागतील.
किती उत्पन्न मिळेल ???
हे जाणून घ्या कि, या कंपनीकडून आपली उत्पादने कमिशनच्या आधारे दिली जातात. कंपनी आउटलेटमधील दुधावर 2.5 ते 10 टक्के तर आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन देते. याशिवाय आइस्क्रीम पार्लर, शेक, पिझ्झा, सँडविच आणि हॉट चॉकलेटमध्ये विकल्या जाणाऱ्या इतर उत्पादनांवर 50 टक्के कमिशन दिले जाते. जर आपले आउटलेट मार्केटमध्ये मोक्याच्या ठिकाणी असेल तर दरमहा किमान 5-10 लाख रुपये मिळतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://amul.com/m/amul-franchise-business-opportunity
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ