तब्ब्येतीने नाजूक आहात? शरीराला ऊर्जा देण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

mens eating diner
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपले शरीर आणि आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असं म्हंटल जात. शरीर मजबूत आणि धष्टपुष्ट असेल तर आपल्याला कोणता आजारही होत नाही आणि झाला तरी त्यातून लवकर बरे होण्यास मदत होते. शरीर मजबूत असेल तर रोगप्रतिकार शक्तीही वाढते. सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांचं आपल्या शरीराकडे दुर्ल्क्ष होत अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला पोषक तत्वे मिळतील आणि शरीराला ऊर्जाही प्राप्त होईल.

बदाम-

बदाम हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असतात. याशिवाय बदामामध्ये प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन ईचे प्रमाणही आढळते. बदाम हृदय, पचनसंस्था आणि त्वचेसाठी आरोग्यदायी आणि उपयुक्त ठरतात. पुरुषांनी त्यांच्या नियमित आहारात बदामाचा समावेश करणे आवश्यक आहे.

सोया-

सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. अशक्तपणा असलेल्या लोकांनी नियमित सोयाबीनची भाजी खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो. शरीराचा योग्य विकास करण्यासाठी सोयाबीन हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे तुमच्या मांसपेशी, नखं, हाडे, केस मजबूत होतात.

अंडी-

संडे हो या मंडे रोज खावो अंडे … स्वतःला पावरफुल बनवण्यासाठी पुरुषांनी रोज कमीत कमी एक अंडे खाणे आवश्यक आहे. एका अंड्यामध्ये ४ ग्रॅम एमिनो अॅसिड आढळते. स्नायूंच्या उभारणीसाठी अमिनो अॅसिड फायदेशीर मानले जाते. आठवड्यातून ५ ते 7 अंडी खाणे आवश्यक आहे.

दूध-

दूध शरीरासाठी खूप चांगले मानले जाते. दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्त्रोत आहे. दुधाच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते. दुधामध्ये काही घटक असतात जे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया सुरू करण्यास आणि चरबीचा संचय कमी करण्यास मदत करतात.