हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Edible Oil Prices : गेले कित्येक महिने वाढ झाल्यानंतर आता देशांतर्गत बाजारात सर्व खाद्यतेलाच्या (शेंगदाणे, सोयाबीन, मोहरी आणि पामोलिन) किंमती खाली येत आहेत. देशांतर्गत बाजारात अनेक खाद्यतेलाच्या किंमतीत प्रतिलिटर 7 ते 10 रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, परदेशातील तेलाच्या किंमती अजूनही खाली आलेल्या नाहीत.
इंडोनेशियाने निर्यात पुन्हा सुरु केल्यामुळे ही घसरण झाली आहे असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इंडोनेशियन सरकारने अलीकडेच 23 मे पासून पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची घोषणा केली. यामुळे आता सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत (Edible Oil Prices) जवळपास $100 ने घसरण झाली आहे. मात्र, सूर्यफूल तेलाच्या किंमती अजूनही वाढलेल्याच आहेत.
सध्याच्या काळात सतत वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चे तेल, गॅस आणि इतर वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत.
किंमती का वाढल्या ?
गेल्या काही महिन्यांपासून परदेशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आयात कमी झाली होती. मात्र, सोयाबीन, भुईमूग, कापूस आणि मोहरी या तेलांमुळे स्थानिक मागणी भागवली जात होती. दरम्यान, इंडोनेशियाने देखील सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमती सुमारे $100 ने कमी केली. ज्यामुळे आता आयातही पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आयात झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
देशांतर्गत बाजारात मोहरीच्या तेलाची किंमत किती आहे ? (Edible Oil Prices)
बाजारात सध्या मोहरीच्या तेलाचा दर 45 ते 50 रुपये प्रतिलिटर इतका कमी आहे. राजस्थान यूपी, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्यांमध्ये देखील मोहरीच्या तेलाची किंमती प्रति लिटर 170 रुपयांच्या खाली आलेल्या आहेत.
तज्ञांचे काय मत आहे ?
येत्या काही दिवसांत देशात मोहरीच्या तेलाचा तुटवडा जाणवू शकेल. त्यामुळे खाद्यतेलाच्या पुरवठ्यातील अडचणी टाळण्यासाठी सरकारी खरेदी संस्थांनी मोहरीप्रमाणेच तेलबियांचा देखील साठा करावा. यासोबतच देशातील किरकोळ व्यवसायातील हेराफेरीला प्रत्येक राज्य सरकारने पायबंद घालावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
केंद्र सरकारने नुकतेच पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. जे महागाई कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. CAIT ने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, यामुळे आता केवळ दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमती किमान 10% तरी कमी होतील. Edible Oil Prices
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.commoditiescontrol.com/commodity-market/vegoil.html
हे पण वाचा :
Gold Price : सोने चकाकले तर चांदीची चमक ओसरली, आजचे नवीन दर पहा
BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा
Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV
Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार
New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च