हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या महागाईला तोंड देणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी लवकरात लवकर एक खुशखबर मिळू शकते. जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती घसरल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी खाद्यतेल संघटनांना खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर प्रमाणे 8 – 10 रुपयांनी कपात करण्याचा आदेश दिला आहे. ज्या कंपनीच्या तेलाच्या किमती एमआरपी आणि इतर ब्रँड पेक्षा जास्त आहेत, त्यासह बाकीच्या तेल कंपन्यांना किमतीच्या दहा ते बारा रुपये भाव कमी करण्याचा सल्ला अन्न मंत्रालयाने दिला आहे. अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनसह उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या निवेदनानुसार उत्पादक आणि रिफायनर्स यांनी ऑफर केलेल्या किंमती लवकरात लवकर कमी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे कपातीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. उत्पादक किंवा रिफायनर्सकडून जेव्हा जेव्हा कमी किंमत केल्या जाते तेव्हा उद्योगाने त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि मंत्रालयाला नियमितपणे कळवले पाहिजे. असं अन्न मंत्रालयाने सांगितलं.
“घरगुती ग्राहक ते खरेदी केलेल्या खाद्यतेलासाठी कमी किंमत देण्याची अपेक्षा करू शकतात. खाद्यतेलाच्या घटत्या किमतीमुळे महागाई कमी होण्यासही मदत होणार असून खाद्यतेलाच्या किमतीमध्ये घसरण सुरू आहे. अजून कपात या खाद्यतेलांमध्ये होऊ शकते” असं देखील ते म्हणाले.