शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, अधिवेशनात आतापर्यन्त ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर काल काँग्रेस आमदार के. सी. पाडवी यांना कोरोनाची लागण झाल्यानांतर आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत पार पडलेल्या अधिवेशनास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही उपस्थिती लावली होती. दरम्यान आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment