‘तिकीट नाही दिलं तर मी काय गप्प बसणार आहे!’- एकनाथ खडसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी । ‘तिकीट नाही दिलं तर काय नाथाभाऊ काय गप्प बसणार आहे काय.’ विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही असं विधान करत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला. खडसे मलकापूर येथे भाजपा उमेदवार चैनसुख सांचेतींच्या प्रचारासाठी आले होते.

आपल्या भाषणात खडसेंनी अनेक मुद्दे मांडले, या निवडणुकीत भाजपला मतदान करा. तसेच मला तिकीट नाही दिले म्हणून मी काय चूप बसणार नाही, विकास कामांसाठी मी कटिबद्ध नेहमी जनतेशी राहणार आहे असे वचन त्यांनी उपस्थित जनतेला दिले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं खडसे यांना तिकीट नाकारले होते. तसेच मुक्ताईनगरचे तिकीट पक्षाने त्यांना न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना दिले आहे. मात्र, यासर्वांत खडसे कमालीचे नाराज आहेत हेच त्यांच्या वक्तव्यावरून जाणवत आहे.