राष्ट्रवादीचे ठरलं!! एकनाथ खडसे, रामराजेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

ramraje khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि भाजप मधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही नेते आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हंटल की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.

विधान परिषदेसाठी एकूण 10 आमदार निवडून येऊ शकतात. यामध्ये भाजप 4, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र एकूण उमेदवार संख्या 12 असल्यामुळे निवडणूकीची चुरस वाढली आहे.

कोणाकोणाला मिळाली उमेदवारी-

भाजप – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड

राष्ट्रवादी काँग्रेस- रामराजें निंबाळकर, एकनाथ खडसे

शिवसेना- आमशा पाडवी, सचिन अहिर

काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे