मुंबई । ‘विधानसभा निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘विधानसभेत जेव्हा मला तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून निवडून आलो असतो’ असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपचा निरोप घेतला. यावर पक्ष सोडण्यासाठी काही कारणं हवं म्हणून खडसेंनी मला विलन ठरवलं असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना खडसेंनी मोठी गौप्यस्फोट केला आहे. (eknath khadse big statement ncp ab form was ready in vidhan sabha)
काय म्हणाले एकनाथ खडसे?
भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं. त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती. आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला आहे.
पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सामूहिक नेतृत्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. तो सर्वांकडून मान्य करुन निर्णय व्हायचा. पण अलिकडच्या काळात भाजप व्यक्तीगत आहे. एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशा स्वारुपाची आहे. निर्णय आधीच ठरलेला असायचा, फक्त नावापुरता विचारलं जायचं.
‘फडणवीसांना विलन ठरवलं नाही’
मी फडणवीसांना विलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये? अलिकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तीगत घटना घडल्या आहेत त्या वेदनादाय होत्या. माझ्या चौकश्या केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याचा मला प्रचंड मनस्ताप झाला.
‘देवेंद्र यांना दोष का दिला?’
विनयभंगाचा खटला कसा दाखल झाला. माझं भाषण मुक्ताईनगरला सुरु होतं. भाषणात मी काहीच अश्लील बोललो नाही. माझ्या शेताच्या आंब्याचा विषय होता. यावरुन अंजली दमानिया यांनी गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. वास्तविक विनयभंगाचा गुन्हा करायचा असेल तर समोर व्यक्ती लागते. कुणी अमेरिकेत राहिलं आणि मी मुक्ताईनगरला राहिलो तर तसे गुन्हे दाखल होत नाहीत.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं पक्षातील ‘या’ २ मंत्र्यांपैकी एकाचे मंत्रिपद जाणार
वाचा सविस्तर -👉 https://t.co/5ObumnzKY3@PawarSpeaks @NCPspeaks @EknathGKhadse #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 22, 2020
शेतकऱ्यांसाठी मदत हवेय ना? मग केंद्रासोबत कशाला कटुता वाढवता- अतुल भातखळकर
वाचा सविस्तर -👉 https://t.co/ZqU3ekomIV@BhatkhalkarA @BJL @CMOMaharashtra @NCPspeaks #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 22, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”